खोकल्याच्या सिरप प्रकरणात मोठी कारवाई; छिंदवाड्यात डॉक्टराला अटक

05 Oct 2025 09:32:12
छिंदवाडा,  
cough-syrup-case-doctor-arrested मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरपमुळे झालेल्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छिंदवाडा येथील एका विशेष पथकाने कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील राजपाल चौक येथून "कोल्ड्रिफ" हे संशयास्पद कफ सिरप लिहून देणारे बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली. सिरप बनवणाऱ्या तामिळनाडूच्या औषध कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


cough-syrup-case-doctor-arrested
 
छिंदवाडा पोलिस अधीक्षक अजय पांडे यांनी सांगितले की, कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या तामिळनाडूतील कांचीपुरम येथील श्रीसन फार्मास्युटिकल कंपनी आणि औषध लिहून देणारे बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. cough-syrup-case-doctor-arrested पारसिया बीएमओ डॉ. अंकित सहलम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत स्पष्टपणे आरोप करण्यात आला आहे की कंपनीने बनवलेले "कोल्ड्रिफ" सिरप संशयास्पद दर्जाचे होते, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर आणि जीवघेणे परिणाम झाले.
Powered By Sangraha 9.0