सिंदी
Nitin Gadkari नजिकच्या तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे जबलपूर एसप्रेसचा थांबा मिळावा, केळझर ते दहेगाव सिमेंट रोड बांधकाम करून देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन सेलू येथील कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिले.
सेलू येथे शेतकरी मेळावा व मंजूर पांदण रस्त्यांचे उद्घाटन कार्यक्रम शनिवारी सेलू येथे पार पडला. या कार्यक्रमाला ना. नितीन गडकरी आले होते. त्यावेळी दहेगाव आणि आजूबाजुच्या २५ गावांच्या समस्यांचे लेखी निवेदन ना. गडकरी यांना देण्यात आले.
सेलू तालुयातील तुळजापूर-दहेगाव आणि २५ गावांतील विद्यार्थ्यांना वर्धा, पुलगाव, अमरावती येथे उच्च शिक्षणासाठी रेल्वे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे जबलपूर गाडीचा थांबा मिळावा, याकरिता वारंवार आंदोलन करण्यात आली. निवेदने रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. पण, समस्या सुटली नाही, असे निवेदनातून सांगण्यात आले. याशिवाय, केळझर-दहेगाव (गोसावी) हा सिमेंट रोड करून द्यावा, असा आग्रह नितीन गडकरी यांच्यापुढे धरण्यात आला.
निवेदन देतेवेळी अमोल पिठाले, प्रमोद भिसे, उमेश राऊत, संजय पिसुड्डे, सचिन महाबुधे, सुनील मिश्रा, प्रणय शेंद्रे, आदी कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.