'तुम आईना देखते रहो'…

05 Oct 2025 14:01:45
आहिल्यानगर
Devendra Fadnavis केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आहिल्यानगर (लोणी) येथे भेट देत साईबाबा समाधी मंदिराला आणि गुरूस्थानाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर लोणी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह आणि फडणवीस यांनी सहकार क्षेत्राच्या पुनरुज्जीवनावर भर दिला आणि विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली.'तुम आईना देखते रहो' असा टोला देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना लावला.
 

Devendra Fadnavis 
विखे पाटलांची आठवण
कार्यक्रमात बोलताना Devendra Fadnavis  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना करून या क्षेत्राला नवे बळ दिले आहे. अमित शाह हे पहिले सहकार मंत्री आहेत, ज्यांनी सहकार चळवळीचं खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं आहे.”फडणवीस पुढे म्हणाले, “महाराष्ट्र हे सहकाराचे माहेरघर आहे. विठ्ठलराव विखे पाटलांनी सुरू केलेली चळवळ बाळासाहेब विखे पाटलांनी पुढे नेली. त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे. विखे पाटलांची चौथी पिढी आजही या चळवळीत कार्यरत आहे.”
 
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर Devendra Fadnavis भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “नगर आणि मराठवाड्यातील दुष्काळ लवकरच संपेल, अशी मला आशा आहे. सध्या राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. आहिल्यानगरमध्ये यंदा अपवादात्मक पावसामुळे काही अडचणी निर्माण झाल्या, पण आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. अमित शाह यांनी देखील आम्हाला सांगितले आहे की, काळजी करू नका, केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे.”विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, “ज्यांनी वर्षानुवर्षे सहकारावर मत्तेदारी समजून सत्ता गाजवली, त्यांच्या तोंडात आता बोट आहे. हे लोक शेतकऱ्यांच्या खिशात हात घालतात आणि आमच्यावर आरोप करतात. मी त्यांना सांगतो की, एकदा आरशात बघा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं?”
 
 
 
महाराष्ट्राला बळ दिले
 
 
कार्यक्रमात बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, “त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी अतुलनीय कार्य केलं. आजचा कार्यक्रम केवळ पुतळा उभारण्याचा नाही, तर त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आहे.”कार्यक्रमाच्या निमित्ताने शाह, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुमारे पाऊण तासाची महत्त्वाची बैठक देखील पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, सहकार क्षेत्रातील धोरणं आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे आहिल्यानगर परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात हा दौरा पार पडला. यामुळे सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0