तभा वृत्तसेवा महागाव,
Anil Deshmukh अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकèयांना भरीव मदत करून त्यांना आधार देण्याची गरज असताना मात्र राज्य सरकार शब्दांचा खेळ करून त्यांच्या भावनांशी खेळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असताना तोकडी मदत शेतकèयांच्या माथी मारण्याचे काम केले जात असून राज्य सरकारचे धोरण हे शेतकèयांच्या जिवावर उठले असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
जून महिन्यापासून पावसाचा जोर सुरूच असल्याने नदी-नाल्यांना पूर येऊन शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उरल्यासुरल्या पिकांवर शेतकèयांची आशा असताना त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा कहर सुरू केल्याने शेतकèयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.त्यामुळे या झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकèयांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ प्रभारी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख महागाव तालुक्यात आले होते.
या दरम्यान दहिसावळी येथील विपुल घोरपडे व नामदेव बावणे या शेतकèयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती होताच त्यांनी दहीसावळी येथे पोहचून दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून केले. त्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले, निवडणुकांपूर्वी शेतकèयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने केले होते. परंतु सत्ता मिळताच सत्तांध झालेल्या महायुती सरकारने शेतकèयांकडे पाठ फिरविली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकèयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.शेतकèयांना भरीव मदत करून त्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज असताना मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता अत्यंत तोकडी मदत त्यांना जाहीर करून शेतकèयांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे, असे ते म्हणाले.
आज राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याने त्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने सरसकट जाहीर करावी अशी मागणीसुद्धा अनिल देशमुख यांनी यावेळी केली.यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष अफजल फारूकी, राजू जयस्वाल, भास्कर पंडागळे, बाबासाहेब गाडे, प्रदीप देवसरकर, संकेत टोणे, सोहेल चव्हाण, नाना इनामदार, अमोल रावते, दिगंबर पाटील या मान्यवर पदाधिकाèयांसोबत यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदारांवर कारवाईची मागणी
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हतबल होऊन नैराश्यग्रस्त झालेल्या दहिसावळी येथील विपुल घोरपडे या युवा शेतकèयाने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. या शेतकèयाच्या चितेची आग शांत होते न होते तोच गावातील नामदेव बावणे या शेतकèयाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन शेतकèयांच्या आत्महत्या होऊनसुद्धा तहसीलदार अभय मस्के यांनी एकदाही गावात येऊन शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन करण्याचे सौजन्य दाखविले नसल्याची माहिती गावकèयांनी अनिल देशमुख यांना देताच त्यांनी थेट यवतमाळ जिल्हाधिकाèयांना फोन लावून तहसीलदारांच्या बेजबाबदार वागण्याची तक्रार आणि त्यांच्या कामाप्रती नाराजी व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
तीळपिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करा : प्रहारची मागणी
मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आर्णी तालुक्यातील दाभडी गावातील शेतकèयांचे मोठ्या प्रमाणावर तिळाचे नुकसान झाले. शेतातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असताना, अनेक शेतकèयांचे पंचनामे न झाल्याने त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.
स्थानिक शेतकरी संघटना व प्रहार पदाधिकाèयांनी तक्रार नोंदवताना सांगितले की, शेतमालाचे नुकसान असूनसुद्धा महसूल विभागाकडून पंचनामे न झाल्यामुळे मोडून गेलेल्या लोकांची नावे नुकसान भरपाईच्या यादीत दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतकèयांचा ठाम आरोप आहे की, पंचनामे करताना पारदर्शकता पाळली गेली नाही. गावातील सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकèयांना जाणूनबुजून वगळण्यात आले असून काहींचीच नावे नुकसानभरपाईच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
या संदर्भात शेतकèयांनी आर्णी तहसीलदारांना निवेदन देऊन तत्काळ पुन्हा पंचनामे करून, सर्व नुकसानग्रस्त शेतकèयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली असून त्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.