कारंजा तालुयातील ५१ गावांतील शेतकर्‍यांना मिळणार सौरकुंपण

05 Oct 2025 19:06:15
कारंजा
Sumit Wankhede वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍याला आपला जीव मुठीत घेऊन शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते. यासाठी शेतकर्‍याला रात्री जागलीला सुद्धा जावे लागते. ही गंभीर बाब लक्षात घेता आमदार सुमित वानखेडे यांनी शेतकर्‍यांना सौरकुंपण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे आता तालुयातील ५१ गावातील शेतकर्‍यांना सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ मिळणार आहे.
 

Sumit Wankhede 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आर्वी विधानसभेतील संवेदनशील गावांची निवड करून शेतकर्‍यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्वी मतदारसंघातील तब्बल २६९ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला असून त्यामुळे शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांकडून पिकांना होणार्‍या नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे. कारंजा तालुयातील ५१ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून याचा फायदा आता शेतकर्‍यांना होणार आहे.
शेतकर्‍यांच्या मेहनतीचे महत्व व पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घेतलेल्या या दूरदर्शी निर्णयाबद्दल तसेच आमदार सुमित वानखेडे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल तालुयातील शेतकर्‍यांनी आनंद व्यत केला आहे.
Powered By Sangraha 9.0