तभा वृत्तसेवा उमरखेड,
Krishnapur flood तालुक्यातील कृष्णापूर येथील गावकèयांनी परिसरातील शेतीतील पिके पूर्णतः नष्ट झाली असून सर्वेक्षणाची वाट न बघता सरसकट अतिवृष्टी जाहीर करून शेतकèयांना मदत करावी अशी मागणी शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाèयांना सरपंचांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कृष्णापूर येथील नागरिक व शेतकèयांचे पावसाच्या पुरामध्ये शेती व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतीतील पिके व माती पूर्णपणे वाहून गेली आहे. खरिप हंगाम तर पूर्णपणे पाण्यात गेला, परंतु जमिनीचा खरडा झाल्यामुळे सुपीक माती पूर्णपणे वाहून गेली. त्यामुळे येणारा रबी हंगामसुद्धा घेणे शक्य नाही.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी, गरीब मजूर हे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अतोनात संकटात आले आहेत. तसेच पीक वाहून गेल्यामुळे आणि शेतकèयांवर पहिलेच कर्जाचे डोंगर असून हा एक नवीन अतिवृष्टीचा डोंगर शेतकèयांवर कोसळला आहे. त्यामुळे शेतकèयांवर आत्महत्येची वेळ आली आहे.
या सर्व बाबींचा विचार शासनाने करून शेतकरी व गावकèयांचा विचार करून तत्काळ मदत जाहीर करावी. सर्वेक्षण न करता सरसकट अतिवृष्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सरपंच आशा रणजित नलावडे, निरंजन कदम, अमोल पतिंगराव, डॉ. रणजित नलावडे, प्रकाश सुरोशे, दीपक भोयर, प्रकाश भोयर, लक्ष्मीकांत बाभळे, विशाल नलावडे, वसंता दिल्लेवार, शिवाजी बाभळे, हनुमंत सावंत, भीमराव बोडखे, गजानन गडदे, विजय जळके हे गावकरी उपस्थित होते.