कारंजा लाड,
Mephedrone seizure Karanja, येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करुन २ लाख ३६ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) हा रासायनिक अंमली पदार्थ जप्त करून दोन जणांना बेड्या ठाकल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण तब्बल ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता दरम्यान करण्यात आली.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोनि जयदीप सहदेव पवार यांनी सरकारतर्फे फिर्यादीत म्हटले की, गुप्त बातमीदारामार्फत त्यांना स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंप, बायपास ते प्राप्ती हॉटेल दरम्यान एमएच ३७ व्ही ७७७ क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये दोन इसम अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करुण दोन सरकारी पंचासमक्ष नमुद ठिकाणी जाऊन नमुद कारमध्ये बसलेल्या इसमांना पंचासमक्ष नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे हाशीब उर्फ आरीस खान आसीफ खान (वय ३२) रा. फारुख कॉलनी कारंजा व अनिस खान सत्तार खान (वय ५२) रा. मजीतपुरा कारंजा असे सांगीतले. त्यावरून कायदेशीर कार्यवाही करून नमुद आरोपी व त्यांच्या ताब्यात असलेल्या कारची पंचासमक्ष झडती घेतली असता एका प्लास्टिक पाऊचमध्ये एम.डी. (मेफेडान) वजन २३.६० किंमत अंदाजे २ लाख ३६ हजार रुपये मिळून आली. तसेच नमुद आरोपीने गुन्हा करताना वापरलेली चारचाकी कार किंमत अंदाजे ५ लाख रुपये असा एकूण ७ लाख ३६ हजार रुईयाचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त केला. यावेळी आरोपी यांना अटक करुण कारागृहात बंद करण्यात आले. तसेच आरोपीविरुध्द कलम ८ (क) २२ (ब) २९ एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिनेशचंद्र शुक्ला, पोनि सुधाकर आडे, जमादार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेशकुमार बिबेकर, शिपाई नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत, मोहम्मद परसुवाले, राजेश गिरी व आदी करीत आहे.