धाडसाचे कौतुक! सापाला सीपीआर देऊन जीव वाचवला

05 Oct 2025 15:31:11
नागपूर
Harshal Shende snake CPR सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) ही सामान्यतः माणसांना दिली जाणारी आपत्कालीन वैद्यकीय मदत असते. पण जर कोणी एखाद्या सापाला सीपीआर देत असेल, आणि त्याच्या जीवाला वाचवतो, तर? हे ऐकूनच अंगावर शहारा येईल, पण नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात अशीच एक अद्भुत आणि धाडसी घटना नुकतीच घडली आहे. सर्पमित्र हर्षल शेंडे यांनी बेशुद्ध पडलेल्या सापाला केवळ पाणी पाजूनच नव्हे, तर सीपीआर देत त्याचा जीव वाचवला आहे.
 
 

Harshal Shende snake CPR 
हर्षल शेंडे हे हिंगणा परिसरातील प्रसिद्ध सर्पमित्र आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी एका घरात साप शिरल्याची माहिती मिळाली. सर्पमित्रांची मदत घेण्यात आली आणि हर्षल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले की, एक सामान्य जातीचा साप घरातील ड्रमखाली अडकलेला होता आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे.हर्षल यांनी प्राथमिक निरीक्षण करताच जाणले की सापात कोणतीही हालचाल नाही, त्याचा श्वास मंदावला आहे आणि त्याला तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यांनी प्रथम सापाला थोडेसे पाणी पाजले. काही क्षणातच सापाने हालचाल करण्यास सुरुवात केली, मात्र त्याची स्थिती अजूनही गंभीर होती.
 
 
 
हर्षल Harshal Shende snake CPR यांनी धाडस दाखवत सापाच्या छातीजवळ हात ठेवून अतिशय दक्षतेने सीपीआर देण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. काही वेळानंतर साप शुद्धीत आला आणि शरीर हलवू लागला. त्याचे प्राण वाचल्याची खात्री झाल्यावर हर्षल यांनी त्याला सुरक्षितपणे जवळच्या जंगलात सोडून दिले.या संपूर्ण घटनेबद्दल हर्षल सांगतात, “साप विषारी नव्हता, पण तो अतिशय कमजोर स्थितीत होता. जर मी वेळेवर काहीच केले नसते, तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता. म्हणून मी पाणी पाजले आणि सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. सौभाग्याने ते यशस्वी ठरले.”ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. लोक हर्षलच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. मात्र, तज्ज्ञांनी आणि वनविभागाने जनतेस विनंती केली आहे की, असा प्रकार कोणीही स्वतः करण्याचा प्रयत्न करू नये. साप असो किंवा इतर कोणताही प्राणी, बेशुद्ध अवस्थेत असल्यास तत्काळ प्रशिक्षित वनकर्मचारी किंवा सर्पमित्रांशी संपर्क करावा.
 
 
ही घटना केवळ एका सापाचा जीव वाचवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा असल्याचे शिकवते. हर्षल शेंडे यांच्यासारख्या लोकांमुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे सिद्ध होत आहे.
Powered By Sangraha 9.0