वर्धा,
OBC reservation ओबीसींच्या आरक्षणावर कुठलेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत आज रविवार ५ रोजी स्थानिक शिवाजी चौकातून विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चाचा समारोप महात्मा गांधी पुतळा परिसरात झाला. मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाबाबत आपला आवाज बुलंद केला.
ओबीसी आरक्षणावर सरकारने मराठा व्यतींची अनैसर्गिक अतिवृष्टीच आणली आहे. राज्य सरकारने आरक्षणाबाबतचा नुकताच काढलेला शासन आदेश हा कुणबी समाजाला ओबीसीच्या बाहेर काढण्याचे हे एक षडयंत्र आहे. सरकारने निर्गमित केलेला शासननिर्णय मराठ्यांना थेट ओबीसीत सामिल करण्यासाठीचा समृद्धी महामार्गच आहे. ओबीसी विरोधी धोरण कधीही खपवून घेतले जाणार नाही, असेही आदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्य सरकारने ओबीसी हिताचे निर्णय घ्यावे, अशीही मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
या मोर्चात अखिल कुणबी संघटना, अखिल तेली समाज संघटना, अखिल पवार समाज मंडळ, अखिल गोवारी संघर्ष समिती, अखिल बलुतेदार समाज मंडळ, अखिल कलार समाज मंडळ, अखिल भोई-कोळी-ढीवर मंडळ, अखिल भटके विमुत संघर्ष समिती, अखिल माळी समाज संघटना, अखिल सुवर्णकार मंडळ, अखिल नाभिक समाज मंडळ, अखिल धोबी समाज मंडळ, अखिल शिंपी समाज मंडळ, अखिल कुंभार समाज मंडळ, मुस्लिम ओबीसी समाज मंडळ, अखिल भावसार समाज मंडळ, अखिल कासार समाज मंडळ, अखिल बारई समाज मंडळ, अखिल सुतार समाज मंडळ, अखिल रघुवी समाज मंडळ, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ, अखिल बंजारा समाज सेवा मंडळ, अखिल धनगर संघर्ष संघटना, अखिल गुरव समाज मंडळ, अखिल वंजारी समाज मंडळ, अखिल गानली समाज मंडळ, सत्यशोधक समाज संघटना, अखिल बेलदार समाज संघटना, संयुत ओबीसी कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी मुती मोर्चा व ओबीसी जनजागृती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.