एटीएम रोकडसह नेली उचलून

05 Oct 2025 13:34:41
समुद्रपूर
atm theft शहरातील उमरेड हिंगणघाट मार्गावरील बँक ऑफ इंडिया बाहेर असलेली एटीएम रोकडसह शनिवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी उचलून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे.
 

  samudrapur-atm theft-bank-of-india-robbery 
प्राप्त माहितीनुसार शहरातील बँक ऑफ इंडिया बाहेर ग्राहकांना पैशाची उचल करण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आली होती.हि मशीन पैशासकट मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली सकाळी काही नागरीक पैशाची उचल करण्यासाठी गेले असता हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच उपविभाग पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायर ठाणेदार रविंद्र रेवतकर यांनी घटनास्थळ गाठून यासंबंधी चौकशी सुरू केले आहे.पैशासकट एटीएम मशीन चोरी गेल्याच्या घटनेची माहिती शहर मिळताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर एटीएम मध्ये ८ लाखाच्यावर रक्कम असल्याचा अंदाज आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायर,ठाणेदार रवींद्र रेवतकर गिरड ठाणेदार विकास गायकवाड उपस्थित झाले होते यावेळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, ठसे तज्ञ, डॉग स्कॉड उपस्थित झाले असून कामाला लागले आहे..आतापर्यंत एटीएम मशीन फोडून पैसे चोरुन नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.मात्र चक्क रोकडसह एटीएम मशीन घेऊन पडाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
Powered By Sangraha 9.0