८ एकरातील सोयाबीन शेतकर्‍यानेच पेटवले !

05 Oct 2025 17:40:33
समुद्रपूर,
soybean farmer fire यावर्षी अतिवृष्टी व सोयाबीन पिकावर आलेल्या विविध रोगामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान, सोयाबीनचे पीक हाती येणारच नाही या भितीने उमरी येथील शेतकरी रुमदेव ठेंगणे यांनी ८ एकरातील सोयबीन पिकाला चक आपल्याच हाताने आगीच्या स्वाधीन केले.

soybean farmer fire
उमरी येथील शेतकरी रुमदेव ठेंगणे यांनी ८ एकरात सोयबीनची पेरणी केली. पिकाला महागडे रासायनिक खते दिले. सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच महागड्या किटकनाशकांची फवारणी सुद्धा केली. यामुळे पिकही चांगले बहरले. पोळ्यात या सोयाबीनला शेंगा लागायला सुरूवात देखील झाली. मात्र, काही दिवसातच सोयाबीनवर यलो मोझॅकसह विविध रोगाचा संसर्ग झाला. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक पिवळे पडू लागले. त्यातच संततधार पावसाला सुरूवात झाली. पावसाने हा रोग जाईन व शेंगा भरेल, अशी आशा बाळगून असताना शेंगा अर्धवट भरल्यामुळे शेतकर्‍याने सोयाबीनची कापणी तर केली मात्र मळणीचा खर्चही निघणार नाही या भितीने शेतकरी ठेंगणे यांनी तळहाताच्या फोडासारखे जपलेल्या ८ एकरातील सोयाबीन पिकाला स्वत:च्या हाताने आगीच्या स्वाधीन केले. यामध्ये शेतकर्‍याचे जवळपास ४ लाखांच्या वर नुकसान झाले आहे. 
Powered By Sangraha 9.0