पशुपालकांचे गुरांच्या तज्ञ डॉक्टराअभावी पाय खोलात

05 Oct 2025 16:55:47
मानोरा,
Veterinary doctor मानोरा ह्या आकांक्षीत तालुक्यातील जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना मोठ्या आशेने विविध सभागृहामध्ये पाठविले ते लोकप्रतिनिधी तालुक्यात सगळ्यात मोठ्या संख्येत असलेल्या शेतकर्‍यांच्या समस्याकडे पोट तिडकीने लक्षच देत नसल्याचे शहरामध्ये असलेल्या श्रेणी १ च्या दवाखान्यातील प्रथमवर्ग पशुवैद्यकीय अधिकार्‍याच्या तब्बल तीन वर्षापासून रिक्त असलेल्या पदावरून पुढे येत आहे.
 

Veterinary doctor  
ग्रामीण मुखवटा असलेल्या व सर्व बाबतीत अनुशेषग्रस्त असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत शेती असून, शेती गोधनाशिवाय अपूर्ण असल्याने या तालुक्यात शहरासकट ग्रामीण भागात सुद्धा पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती शेतकरी व पशुपालकांच्या सोईसाठी शासनाकडून करण्यात आलेली आहे. बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या पाळीव प्राण्यांना कुठलाही आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी व कुठलेही नैसर्गिक आपत्तीत, अपघातात उपरोक्त पाळीव प्राण्यांपैकी कोणाचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास लागणारे मृत्यूचे दाखले, उत्तरीय तपासणीचे दाखले आदी मिळविण्यासाठी सक्षम अधिकारी मागील अनेक वर्षांपासून तालुक्याचे ठिकाण असलेल्या मानोरा येथे शासनाकडून नेमण्यात न आल्याने शहर व तालुक्यातील पशुपालक व शेतकर्‍यांना पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ असा मोठा फलक लावलेल्या मानोरा शहरातील गुरांच्या दवाखान्यात येरझारा घातल्याशिवाय पर्याय सध्या तरी उपलब्ध नसल्याने नैसर्गिक आपत्तीला सातत्याने सामोरे जाणार्‍या पशुपालक व शेतकर्‍यांची दखल राज्य व केंद्र पातळीवर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी द्वारा आणखी किती वर्षांनी घेतली जाईल असा सवाल पशुपालक व शेतकर्‍यांकडून लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे.
नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसल्याने अशा आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा उत्तरीय तपासण्याचे दाखले, मृत्यूचे दाखले घेण्यासाठी सातत्याने शहरातील गुरांच्या दवाखान्यात पशुपालक व शेतकर्‍यांना येरझारा घालूनही काहीच हाती लागत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया असोला खुर्द येथील शेतकरी वसंतराव राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली. 
Powered By Sangraha 9.0