एकाच दिवसात 5340 शेतकर्‍यांच्या खात्यावर 46.72 कोटी

06 Oct 2025 19:05:01
गोंदिया,

Gondia farmers news जिल्ह्यातील धान उत्पादकांना शासकीय हमी भाव केंद्रावर धन विक्री करून महिने लोटले असताना धानाची रक्कम मिळाली नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांना शासनाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर निधी उपलब्ध करून आधार दिला आहे. आज 6 ऑक्टोबर रोजी जिल्हा पणन कार्यालयाने 5340 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तब्बल 46 कोटी 72 लाख 62 हजार 495 रुपये थेट हस्तांतरीत केले.
 

Gondia farmers news 
यामूळे धान उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी शासनाने धान खरेदीचे 125 कोटी 77 लाख 47 हजार 225 रुपयाचा निधी जिल्हा पणन कार्यालयाकडे हस्तांतरीत केला होता. 4 ऑक्टोबर रोजी 3226 शेतकर्‍यांच्या बँक खत्यावर 27 कोटी 65 लाख 7 हजार 591 रुपये जमा करण्यात आले होते. जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात 70 हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली होती. जिल्हा पणन कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थांनी 53158 शेतकर्‍यांकडून विक्रमी 25 हजार 13 हजार 344 क्विंटल धान केले. खरेदी केलेल्या धानाची किमत 578 कोटी 6 लाख 91 हजार 361 आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत 351 कोटी 31 लाख 24 हजार 811 रुपये तर 3 ऑक्टोबर रोजी 125 कोटी 77 लाख 47 हजार 225 रुपये, असे 477 कोटी 8 लाख 72 हजार 36 रुपये जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून प्राप्त झाले आहे. आतापर्यंत 42 हजार 551 शेतकर्‍यांच्या खात्यावर 413.12 वर्ग झाले आहेत यामूळे धान उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.
Powered By Sangraha 9.0