शेत-तलावात आढळले तीन युवकांचे मृतदेह

06 Oct 2025 10:51:33
गोंदिया, 
bodies-of-three-youths-found-in-deori जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे एका शेततळ्यात तीन युवकांचे मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक आचले (२०), आदित्य बैस (१६), तुषार राऊत (१८) तिघेही राहणार पुराडा अशी मृत युवकांची नावे आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हे अपघात की घातपात अशा शंकांना पेव फुटले आहे.
 
bodies-of-three-youths-found-in-deori
 
मिळालेल्या माहितीनुसार मृत तिघेही युवक पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेल्याची माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, तीन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून ही घटना अपघात की घातपाताची अशा चर्चा रंगल्या आहे. दरम्यान, रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. bodies-of-three-youths-found-in-deori तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0