आरमोरीतील नागरिकांना घरांसाठी मिळाले पट्टे

06 Oct 2025 18:09:41
गडचिरोली,
leases houses छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमादरम्यान ’सर्वासाठी घरे’ या मोहिमेला गती देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते 1 ऑक्टोबर रोजी आरमोरी येथील नागरी भागातील 30 व्यक्तींना निवासी प्रयोजनार्थ पट्टे वाटप करण्यात आले.
 
 

ghare 
 
 
1 जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पट्टे वाटपाच्या या कार्यक्रमावेळी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान, आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, नायब तहसीलदार हरिदास दोनाडकर, ललितकुमार लाडे, धनराज वाकुळकर, बेबी बरडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरमोरी तहसीलदार यांच्यामार्फत ठाणेगाव, किटाळी, इंजेवारी, देलनवाडी, मोहझरी ऊर्फ सुकारबोडी, मोहटोला ऊर्फ कुकडी, डारली, देऊळगाव, बोडधाचक व आरमोरी या 10 गावांतील एकूण 219 अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले आहे.leases houses सदर नागरिक मागील अनेक वर्षापासून शेती करीत होते. मात्र त्यांना पट्टा मिळाला नव्हता. पट्टा मिळाल्याने आता विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
Powered By Sangraha 9.0