ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभात दीपक शेंडेकर यांचा सन्मान

06 Oct 2025 15:38:16
नागपूर,
Deepak Shendekar जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह मध्ये ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमात फेस्कॉम पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांचे कार्य गौरवून नागपूर मनपा तर्फे सन्मान करण्यात आले.
 
Deepak Shendekar
 
अतिरिक्त आयुक्त (सेवा) वैष्णवी बी. यांच्या हस्ते डॉ. शेंडेकर यांना नागपूर महानगरपालिकेचा दुपट्टा गळ्यात घालून व तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय सहकार नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे हिरासाव मिश्रीकोटकर, सिनियर सिटीजन काउन्सिल ऑफ नागपूरचे मनोहर खर्चे, सुरेश रेवतकर, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे डॉ. राजू मिश्रा, आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) चे प्रा. प्रभुजी देशपांडे व एड. अविनाश तेलंग यांनाही सन्मानित केले गेले. Deepak Shendekar कार्यक्रमाचे संचालन मनपा जनसंपर्क अधिकारी मनिष तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मनपा सचिव व उपायुक्त रंजना लाड यांनी केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी “बाकी शून्य” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला, ज्यावर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
 
कार्यक्रमात विविध ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य जसे की काशिनाथ धांडे, मधुकर पाठक, ईश्वर वानकर, मोहन पांडे, उल्हास शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. Deepak Shendekar या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचे कार्य गौरवले गेले आणि त्यांना समाजात मिळणाऱ्या महत्त्वाची जाणीव करून देण्यात आली.

सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0