नोव्हेंबरपासून FASTag नसलेल्या वाहनचालकांना मिळणार मोठा दिलासा

06 Oct 2025 14:14:19
नवी दिल्ली, 
fastag-new-rules राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने देशभरातील राष्ट्रीय आणि द्रुतगती महामार्गांवरील टोल भरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. या नव्या निर्णयामुळे वैध FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुधारित नियम १५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.
 
fastag-new-rules
 
आतापर्यंत FASTag नसलेल्या वाहनांना रोखीने टोल भरताना दुप्पट शुल्क (२ पट) आकारले जात होते, ज्यामुळे वाहनचालकांवर आर्थिक ताण येत होता. मात्र आता NHAI ने या नियमात सवलत दिली आहे. १५ नोव्हेंबरपासून वाहनचालकांनी जर UPI किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमातून टोल भरला, तर त्यांना केवळ १.२५ पट शुल्क द्यावे लागेल. fastag-new-rules उदाहरणार्थ, जर एखाद्या वाहनाचे FASTag टोल १०० रुपये असेल, तर रोखीने भरल्यास २०० रुपये आणि डिजिटल माध्यमातून भरल्यास फक्त १२५ रुपये टोल द्यावा लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सांगितले की या बदलामुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि टोल प्लाझांवरील वाहतूक अधिक सुलभ होईल. दरम्यान, NHAI ने नुकतीच देशभरातील सुमारे १,१५० टोल प्लाझांवर ‘FASTag वार्षिक पास’ सुविधा सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनी सुरू झालेल्या या सुविधेला आतापर्यंत १.४ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे प्राधिकरणाने FASTag नसलेल्या वाहनांसाठीही डिजिटल टोल भरण्याची ही सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0