ईडीची मोठी कारवाई! २० कोटींची संपत्ती पीडितांच्या हाती!

06 Oct 2025 16:29:39
बेंगळुरु
ED action, प्रवर्तन संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करत पीडित नागरिकांना त्यांची संपत्ती परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ईडीच्या बेंगळुरु झोनल कार्यालयाने तब्बल २०.१६ कोटी रुपयांच्या मालमत्तेची परतफेड सुरू केली असून, ही मालमत्ता ठगीचा बळी ठरलेल्या मूळ हक्कदारांना दिली जाणार आहे. ही कारवाई 'एम/एस इंजाज इंटरनॅशनल' आणि त्याच्याशी संबंधित अन्य घटकांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात केली जात आहे.
 

ED 
या प्रकरणाची चौकशी ईडीने महसूल निरीक्षक, तहसीलदार कार्यालय, येलहंका यांच्याकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर सुरू केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ७ सप्टेंबर २०१८ रोजी विल्सन गार्डन पोलिस स्टेशन येथे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला होता. चौकशीत समोर आले की, इंजाज इंटरनॅशनल ही भागीदारीत चालवली जाणारी कंपनी चिट फंड आणि मनी सर्क्युलेशन योजनेच्या नावाखाली नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा करत होती. जमा केलेल्या निधीचा वापर कंपनीने विविध मालमत्ता खरेदीसाठी आणि वैयक्तिक गरजांसाठी केला. परिणामी, अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली.
 
 
या ED action, आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात सध्या कर्नाटक सीआयडीची फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट चौकशी करत आहे. दरम्यान, ईडीने तपासाच्या दरम्यान या फर्मची अनेक स्थावर मालमत्ता जप्त केली आणि संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात पीडितांनी आणि मूळ हकदारांनी धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ च्या कलम ८(८) अंतर्गत संपत्तीच्या परतफेडीसाठी अर्ज सादर केला होता.ईडीने या अर्जावर कोणतीही हरकत नोंदवली नाही आणि न्यायालयात आपली बाजू मांडताना परतफेडीस सहमती दर्शवली. परिणामी, प्रिन्सिपल सिटी सिव्हिल अँड सेशन न्यायालयाने ईडीच्या शिफारशीला मान्यता देत आदेश दिला की जप्त केलेली मालमत्ता मूळ हक्कदार आणि फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना परत केली जावी.
दिलासा
 
 
या निर्णयामुळे ED action,  अनेक पीडितांना मोठा दिलासा मिळणार असून, न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याला यश मिळाले आहे. ईडीने परतफेडीची औपचारिक प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच २०.१६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लाभ संबंधित हकदारांना मिळणार आहे. ही कारवाई देशातील आर्थिक फसवणुकीविरोधात ईडीने उचललेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
Powered By Sangraha 9.0