दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने गाठले उच्चांक दर

06 Oct 2025 12:17:15
नवी दिल्ली, 
Gold rises ahead of Diwali दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या सणासुदीपूर्वी सोन्याचे दर उच्चांक गाठत आहेत. आज ६ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३७० रुपयांनी वाढून प्रतितोळा १,२०,७७० रुपयांवर स्थिरावला आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचे दर १,२५० रुपयांनी वाढून १,१०,७०० रुपयांवर पोहोचले असून, १८ कॅरेट सोन्याचा भाव १,०३० रुपयांनी वाढून ९०,५८० रुपयांवर स्थिर झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली होती, मात्र दिवाळीच्या काही दिवस आधी पुन्हा त्यात जोरदार वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यांचा सोन्याच्या दरावर प्रभाव दिसत आहे.
 
 
Gold rises ahead of Diwali
 
 
मुंबई आणि पुण्यातील आजचे सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत: २४ कॅरेट १२,०७७ रुपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट ११,०७० रुपये प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट ९,०५८ रुपये प्रति ग्रॅम. १० ग्रॅमच्या प्रमाणात ही किंमत २४ कॅरेटसाठी १,२०,७७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,१०,७०० रुपये आणि १८ कॅरेटसाठी ९०,५८० रुपये आहे. सोन्याचे दर वाढण्यामागे सणासुदीतील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा प्रभाव आहे.
 
 
स्पॉट गोल्ड १.१ टक्क्यांनी वाढून $३,६८३.२४ प्रति औंसवर बंद झाले आहे, तर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, आणि सातत्याने वाढणारे दर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चमक अनेक गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करत आहेत. मुंबई आणि पुण्यातील दर इतर शहरांपेक्षा समान आहेत, पण स्थानिक मागणी, पुरवठा, कर आणि बाजारपेठेतील मध्यस्थांच्या शुल्कांवरही किंमती अवलंबून असतात.
Powered By Sangraha 9.0