कळंब नगर पंचायतला मिळाले नियमांचे गुरू ?

06 Oct 2025 19:32:48
कळंब,
Kalamb Nagar Panchayat, कळंब नगर पंचायतला प्राप्त निधीअंतर्गत वाके लेआऊटमध्ये कळंब शहरवासींच्या हितार्थ शासनाने दिलेल्या निधीतून संडास बाथरूमचे मोठ्या रकमेचे बांधकाम सुरू आहेपरंतु या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होत असून ज्या ठिकाणी मुरूम पाहिजे होता त्या ठिकाणी मातीने सर्व जोता भरून घेतल्यानंतर मुरमाचा मुलामा देण्यात आल्याने ते काम काय दर्जाचे होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
 

  Kalamb Nagar Panchayat 
कळब नगर पंचायतला नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी हे नियमांना पाळणारे असून त्यांनी गावामध्ये सुरू असलेल्या या मोठ्या कामाची सखोल चौकशी तर केलेलीच असणार आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या नियमांतर्गत या कामांमध्ये मातीचा वापर करू दिला आणि मुरमाचा मुलामा चढविला, हे कळंबच्या जनतेला कलायला हवे आहे. कळंब नगर पंचायतचे नगरसेवक मुख्याधिकाèयांना काय प्रश्न विचारणार, असे एक ना अनेक निर्माण झाले असून कळंबमध्ये नगर पंचायतद्वारा होत असलेली विविध विकास कामे निकृष्टच होत असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करणारे मुख्याधिकारी खरंच नियम पाळणार अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.
नवे मुख्याधिकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्याने त्यांच्याकडून शहरवासींना खूप अपेक्षा आहेत. त्या त्यांनी पूर्ण कराव्या, अशी सर्वसामान्य जनतेकडूनसुद्धा मागणी होत आहे. त्यामुळे या संडास बाथरूमच्या होत असलेल्या अनागोंदी स्वरूपाच्या बांधकामाला कळंबचे मुख्याधिकारी खरेच लगाम लावेल ?
Powered By Sangraha 9.0