कारंजा लाड,
karanja police छुप्या मार्गाने रासायनिक पदार्थ शहरात आणणार्या दोघांना शिताफीने अटक केल्यानंतर कारंजा शहर पोलिसांनी सलग दुसर्या दिवशी ५ ऑटोबर कारवाईचा धडाका कायम ठेवत संशयावरून एक विनापरवाना बंदुक आणि काही ज्वलंत स्फोटके जप्त करून हे साहित्य जवळ बाळगणार्या एका जणाविरुद्ध आर्म अॅट अन्वये गुन्हा दाखल केला व त्यास अटक केली आहे.
कारंजा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ ऑटोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास स्थानिक सावरकर चौक जवळील रेल्वे पटरीजवळ एका आरोपीकडून एक मोठी लाकडी बट असलेली लोखंडी बॅरल, ट्रीगर गार्ड असलेली बंदुक (किंमत अंदाजे ४ हजार रुपये) , स्फोटक साहित्य असलेली नायलॉन थैली, मोठ्या गोल आकाराचे लोखंडी २३ छरे, प्लास्टिक डब्ब्यात असलेली काळ्या रंगाची स्फोटक पावडर, बंदुकीचा बार उडविण्याकरिता वापरात असलेली लोखंडी टीकल्या, एक जुनी एमएच ३७- ८८४६ क्रमांकाची मोटार सायकल (अंदाजे किंमत ३० हजार रुपये ) असा एकूण ३४ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सरकारतर्फे सहायक पोलिस निरीक्षक जयदिप सुखदेव पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिलसिंग जसरतसिंग अंद्रेले, रा. अशोक नगर कारंजा याच्याविरुद्ध कलम ३,२५ आर्म अॅटनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.karanja police पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.