video लेडी मूसेवाला! 'दैट गर्ल'ने गाठला लोकप्रियतेचा शिखर

06 Oct 2025 13:27:59
पंजाब,
Parmjeet Kaur सोशल मीडियाची ताकद काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोगा जिल्ह्यातील दुनेके गावातील १९ वर्षांची परमजीत कौर. अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या परमजीतने फेसबुकवरील एका साध्या व्हिडीओच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती लाखो लोकांच्या ओळखीची झाली आहे, तिचे चाहत्यांमध्ये 'लेडी मूसेवाला' म्हणून नाव घेतले जाते.
 
 

Parmjeet Kaur  
परमजीतचे वडील दिहाडी मजूर असून आई इतरांच्या घरांमध्ये काम करते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही परमजीतने आपले संगीतप्रेम टिकवून ठेवले. शालेय जीवनापासूनच रॅप आणि गायन यामध्ये तिची रुची होती. पुढे कॉलेजमध्ये तिने संगीत हा विषय निवडला आणि आपल्या आवडीला अधिक गंभीरपणे घेतले.परमजीतने सुरुवातीला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून काही गाण्यांचे व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केले. यातील एका व्हिडीओवर प्रसिद्ध ब्रिटिश म्युझिक प्रोड्युसर आणि डायरेक्टर मन्नी संधू यांची नजर पडली. त्यांनी परमजीतच्या आवाजातील वेगळेपणा ओळखला आणि तिच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ‘दैट गर्ल’ हे गाणे मोहालीमध्ये चित्रीत करण्याचे ठरवले.
 
 
या गाण्याची Parmjeet Kaur सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हे गाणे एखाद्या आलिशान स्टुडिओमध्ये नव्हे, तर पंजाबमधील एका Airbnb घरामध्ये रेकॉर्ड करण्यात आले. या वेळी गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान बाहेरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाजही येत होते, मात्र परमजीतच्या स्पष्ट आणि भावपूर्ण आवाजामुळे रेकॉर्डिंग अत्यंत प्रभावी ठरले. गाण्याच्या व्हिडीओलाही कोणताही भपका न देता साधेपणातच सौंदर्य राखण्यात आले आहे, ज्यामुळे ते अधिकच लक्षवेधी ठरले आहे.
 
 
 
 
 
‘दैट गर्ल’ हे Parmjeet Kaur गाणे २३ सप्टेंबर रोजी यूट्यूबवर रिलीज झाले असून आतापर्यंत ६ मिलियनहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. अनेक युजर्सनी तिच्या आवाजाची आणि शैलीची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे, आणि ती दररोज वाढतच आहे.सोशल मीडियावरून सुरू झालेली परमजीतची ही संगीतयात्रा आज व्यावसायिक क्षेत्रात पोहोचली असून, तिच्या जिद्दीची आणि मेहनतीची ही कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अत्यंत सामान्य पार्श्वभूमी असतानाही आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि कलागुणांच्या बळावर ती आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.लेडी मूसेवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परमजीत कौरच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे आता संगीतप्रेमींची नजर लागून आहे.
Powered By Sangraha 9.0