अनिल कांबळे
नागपूर,
Dr. Sameer Paltewar arrest गेल्या काही महिन्यांपासून शहरात सर्वाधिक चर्चीत असलेल्या मेडिट्रीना रुग्णालयातील 11 काेटीपेक्षा जास्त रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये संचालक डाॅ. समीर पालतेवारला अखेर पाेलिसांनी अटक केली. पालतेवारसह 13 आराेपींचे अटकपूर्व जामीन मागणारे अर्ज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.व्ही. धुळधुळे यांनी शनिवारी ेटाळून लावले हाेते. गुन्हा दाखल झाल्यावर 18 दिवसांनी ही कारवाई झाली हाेती, हे विशेष.
या प्रकरणात रुग्णालयाचे भागीदार गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पाेलिसांनी एकूण 18 आराेपींविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 2006 मध्ये चक्करवार यांनी डाॅ. पालतेवार व इतरांसाेबत मिळून व्हीआरजी हेल्थ केअर कंपनी सुरू केली हाेती. त्यानंतर 2012 मध्ये मेडिट्रीना रुग्णालयाची स्थापना झाली. दरम्यान, 2016 मध्ये इतर भागीदार बाहेर पडल्यामुळे चक्करवार व पालतेवार हे दाेघे 50-50 टक्क्यांचे भागीदार झाले. काही दिवसांनी पालतेवारने मनमानीपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली. पालतेवारने मुलासाेबत मिळून नवीन कंपनी स्थापन केली. तसेच, मेडिट्रीनाच्या खात्यातून 2020-21 मध्ये दाेन काेटी, 2021-22 मध्ये 2.91 काेटी, 2022-23 मध्ये 3.36 काेटी तर, 2023-24 मध्ये 3.13 काेटी असे 11.41 काेटी रुपये काढले. याची कुठलीही कल्पना चक्करवार यांना देण्यात आली नाही, असे विविध गंभीर आराेप तक्रारीत करण्यात आले हाेते. चक्करवार यांच्या तक्रारीच्या चाैकशीनंतर पाेलिसांनी पालतेवार व 13 जणांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. अटकपूर्व जामीन ेटाळण्यात आल्यानंतर डाॅ. पालतेवार भूमीगत झाला हाेता. मात्र, रविवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने डाॅ.पालतेवारला अटक केली.