नागपूर,
Young Kalam Science Center राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘झेप यशाची’ या उपक्रमांतर्गत शिकणाऱ्या आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच धंतोली येथील ‘यंग कलाम सायन्स सेंटर’ येथे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन त्यांना प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख करून देणे हा होता.
सायन्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, भूगोल यांसारख्या विषयांवरील विविध वर्कींग मॉडेल्स आणि प्रयोग उत्तम प्रकारे समजावून सांगण्यात आले. Young Kalam Science Center मुलांनीही प्रयोग स्वतः करून पाहत प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रक्रियेतून त्यांच्या ज्ञानात आणि समजुतीत मोठी भर पडली. प्रत्येक विषयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोग समजावून सांगण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिकण्याची तयारी पाहून सर्व उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी लोककल्याण समिती तर्फे विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय करण्यात आली होती. संस्थेचे व्यवस्थापक विरेंद्रजी मल्होत्रा आणि सविता जोशी यांनी या उपक्रमाचे मार्गदर्शन केले. Young Kalam Science Center हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद चारु सुमंत, नेहा अनगल, वैशाली पालकर, कविता राजवाडकर, अतुल जोशी, राजेंद्र जोशी, सुरेशजी बोरगावकर, प्रद्युम्न शौचे आणि एकनाथ दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना केवळ विज्ञानाची ओळख नाही, तर “शिकत असताना अनुभव घ्यावा” ही शिकवणही मिळाली.
सौजन्य: रोशनी नवघरे \आसावरी कोठीवान, संपर्क मित्र