पूरग्रस्तांसाठी रामकृष्ण वाघ कॉलेजची मदत

06 Oct 2025 15:26:21
नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्यात आली.
 
Ramakrishna Wagh College
 
या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये करिअर कट्टा समन्वयक, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग सहभागी झाले. रॅलीद्वारे निधी संकलित करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. Ramakrishna Wagh College या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. मारोती वाघ आणि संचालिका सौ. लता वाघ यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य प्रदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही उत्साहपूर्ण सहकार्य केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढली असून, त्यांनी केवळ शैक्षणिक मदत नाही तर समाजातील गरजू लोकांसाठी सक्रिय योगदान देण्याची संधी प्राप्त केली.

सौजन्य सायली लाखे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0