तभा वृत्तसेवा दिग्रस,
Rashtriya Swayamsevak Sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटन एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. त्याग समर्पण भावनेतून कार्य करणाèया संघाने राष्ट्रभक्ती व संस्कृतीचा प्रसार प्रसार व संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अनेक संघर्ष, आवाहन संघापुढे आले. मात्र डगमगून न जाता राष्ट्राची निस्वार्थ सेवा हेच संघाचे ध्येय राहिले आणि हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वयंसेवकांनी जनमानसात प्रचार प्रसार करावा, असे प्रतिपादन यवतमाळ विभाग सहकार्यवाह संतोष मुत्तलवार यांनी केले.
दिग्रसला रविवार, 5 ऑक्टोबरला येथील दिनबाई विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून मुत्तलवार बोलले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दिनेश लड्ढा, नगर संघचालक वसंत खोडके व तालुका संघचालक दत्तात्रय बनगिनवार उपस्थित होते.
विजयादशमी उत्सवानिमित्त संध्याकाळी 5 वाजता स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन निघाले होते. ठिकठिकाणी लोकांनी पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली. मार्गावर सडा रांगोळी काढून स्वागत केले. संध्याकाळी 7 वाजता मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला संघावर प्रेम करणाèया शेकडो लोकांनी उपस्थिती दर्शविली. हा उत्सव साजरा करण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.