नवी दिल्ली,
Rohit-Virat World Cup भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या निवडीत मोठा बदल करत बीसीसीआयने रोहित शर्माकडून वनडे कर्णधारपद काढून शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच, बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्माला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, जेव्हा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपलब्ध नसतील, तेव्हा त्यांना विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यामुळे खेळाडूंची निवड फक्त त्यांच्या कामगिरीच्या आधारावर होईल. आगरकर यांनी म्हटले की, हा नियम काही वर्षांपूर्वीच स्पष्ट करण्यात आला होता की जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसतील, तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक आहे. गेल्या दशकभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त राहिलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आता या नियमाचा अपवाद राहणार नाही.
विराट कोहली (३६) आणि रोहित शर्मा (३८) सध्या फक्त वनडे फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत; त्यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हे दोघे पुन्हा मैदानावर उतरणार आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बीसीसीआयच्या मते, २०२७ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. रोहित शर्मा यांच्याकडून कर्णधारपद काढून शुभमन गिलला जबाबदारी देण्यात आल्यामुळे, या बदलांचा उद्देश फक्त वर्तमान सामन्यांसाठी नाही तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे. खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटद्वारे आपली फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयने अधोरेखित केले आहे.