तिला बोलावले... ड्रग्ज पाजले मग 'बलात्कार', अश्लील व्हिडिओ केले तयार

06 Oct 2025 18:31:52
दिल्ली,
student was raped in Delhi राजधानी दिल्लीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने उत्तर दिल्लीतील आदर्श नगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहेत.
 

student was raped in Delhi  
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ सप्टेंबर रोजी अमनप्रीतने मैत्री आणि त्याच्या मित्रांसोबत भेटण्याच्या बहाण्याने तिला ड्रग्ज पाजले. त्यानंतर तिला जबरदस्तीने आदर्श नगर हॉटेलमध्ये बंदिवान करून ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढण्यात आले.आरोपीने हे छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. त्याने तिला अनेक वेळा त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले आणि वारंवार लैंगिक छळ, धमक्या आणि मानसिक छळ केला.
 
 
तक्रारीच्या आधारे, आदर्श नगर पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ६४(१) आणि १२३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी अमनप्रीतला शोधण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक आणि मॅन्युअल तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0