तभा वृत्तसेवा
बाभुळगाव,
atul-wankhade : माध्यमिक शिक्षण विभागात वेतन पथक अधीक्षक म्हणून यवतमाळ येथे नव्याने रुजू झालेले अतुल वानखडे यांचे यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सचिव प्रमोद देशमुख, मार्गदर्शक विजय विसपुते, नागोराव चौधरी, किरण देशमुख, अभय पारखी, निलेश बांदुरकर व शिक्षकेतर संघटनेचे विजय डांगे उपस्थित होते. यावेळी भविष्यनिर्वाह निधी पावत्या, परतावा, ना परतावा, रजा रोखीकरण इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघ आपणास सहकार्य करीत राहील, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने वेतन पथक अधीक्षक अतुल वानखडे यांना देण्यात आली.