188 वर्षांचे वटवृक्षाचे प्रत्याराेपण गाेरेवाडात हाेणार !

07 Oct 2025 14:35:29
अनिल कांबळे
नागपूर, 
Banyan tree transplantation : पाचपावली येथे ई-लायब्ररीच्या निर्मितीत अडथळा ठरत असलेल्या 188 वर्षांच्या वटवृक्षाच्या प्रत्याराेपणाची अटींसह परवानगी दिली हाेती. साेमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अद्याप प्रत्याराेपणाची प्रक्रिया सुरू झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली. प्राचीन वटवृक्षाला गाेरेवाडा परिसरात प्रत्याराेपित करण्याबाबत विचार सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती महापालिकेने न्यायालयात दिली. न्यायालयाने वटवृक्षाच्या प्रत्याराेपणनंतर वृक्ष जगणार याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लिखित हमीपत्र दिल्यावर कठाेर अटींसह परवानगी दिली आहे, हे विशेष.
 
 
banyan tree
 
 
 
शहरात विविध विकासकार्यासाठी हाेणाèया वृक्षताेडीबाबतच्या प्रक्रियेबाबत महापालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमाून ‘रिअल टाईम’ माहिती देण्यात यावी, असा सल्ला याचिकाकर्त्याने दिल्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला यावर एका आठवड्यात जबाब नाेंदविण्याचे निर्देश दिले. वृक्ष संरक्षण कायद्याच्या नियमांचे पालन न करता नागपूर शहरातील विकास प्रकल्पांसाठी 1 हजार 374 वृक्षांच्या कत्तलीच्या प्रस्तावावर आक्षेप घेणारी जनहित याचिका दाखल पर्यावरण प्रेमी प्रीती पटेल आणि इतर तीन नागरिकांनी दाखल केली आहे. या प्रकरणावर न्या. अनिल किलाेर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.
 
 
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी वृक्षताेडीबाबत देण्यात येणाèया परवानगीबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रकाशित करण्याबाबत निर्देश देण्याची न्यायालयाकडे विनंती केली. वृक्षताेडीची परवानगी देताना संबंधित परिसरात वृक्षगणनाही करण्यात यावी आणि यानंतरच वृक्षताेडीबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंतीही याचिकाकर्त्याने अर्जाच्या माध्यमातून केली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या या अर्जातील शिारसीबाबत महापालिकेला एका आठवड्यात जबाब नाेंदविण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांर्ते अ‍ॅड. मृणाल चक्रवर्ती, राज्य सरकारर्ते अ‍ॅड. दीपक ठाकरे आणि महापालिकेर्ते अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
 
Powered By Sangraha 9.0