देवळी,
taekwondo championship बिलासपूर (छत्तीसगड) येथील भट्टरी स्टेडियमवर ४ ते ५ ऑटोबर दरम्यान झालेल्या खुल्या राष्ट्रीय तायवांदो स्पर्धेत सीएडी पुलगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. या स्पर्धेत देशभरातील तब्बल २२ राज्यातील ८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
वर्धा जिल्हा तायवांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सीएडी पुलगावच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई केली. खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक तयारी, शिस्तबद्ध खेळ व जिद्द दाखवत राष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये स्वानंदी ढोक, भार्गवी कोंबे, सार्थक नितीनवरे, निशांत ढोणे, श्रावणी घोरडकर, कोमल शिंदे, रुद्राक्ष मिश्रा, अस्टोन लिनो, अब्रायन लिनो, रितिका सिंग, देव्यांशी सिंग, रोशनी खराडे आणि वैष्णवी पवार यांचा समावेश आहे. रौप्य पदक विजेते दीर्घ चौधरी, स्वरांशी थूल, दीक्षा, वेदिका सातपुते तर कांस्य पदक विजेत्यांमध्ये वेदही नितीनवरे, स्वरा ढोक, ओम घोरडकर, आदिनाथ नायर, आयुष खराडे, शिवराज, अर्शप्रीत कौर, अँड्रिया लिनो यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंनी विविध वजन गटांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले असून, सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड थायलंड येथे होणार्या जागतिक तायवांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय सीएडी पुलगावचे कमांडंट कौशलेश पंघाल, वर्धा जिल्हा तायवांदो असोसिएशनचे सचिव व प्रशिक्षक शाम खेमस्कर तसेच पालकांना दिले आहे.taekwondo championship खेमस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सीएडी पुलगाव हे जिल्ह्यातील तायवांदोचे अग्रगण्य केंद्र बनले आहे. स्थानिक पातळीवरून जिल्हा व राज्य स्तरावर या यशाचे कौतुक होत आहे. या खेळाडूंनी वर्धा जिल्ह्याला राष्ट्रीय तायवांदो नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे. पुढील काळात जागतिक स्पर्धांमध्येही हे खेळाडू भारताचा झेंडा उंचावतील, अशी अपेक्षा वर्धा जिल्हा तायवांदो असोसिएशनचे सचिव श्याम खेमस्कर यांनी व्यत केली.