वणी नप कर आकारणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

07 Oct 2025 14:20:26
तभा वृत्तसेवा
वणी, 
mla sanjeevreddy bodkurwar वणी नगर परिषदद्वारा 2025 ते 2029 पर्यंतच्या प्रस्तावित केल्या गेलेल्या चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन स्थगित करण्याबाबत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेऊन त्यावर वणी नगर परिषदेला त्वरित सकारात्मक निर्देश देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन दिले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी नगर परिषद द्वारा 2025 ते 29 पर्यंतच्या प्रस्तावित केल्या गेलेल्या चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन स्थगित करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत अमरावती येथे चर्चा केली होती.
 
 

wani nagar 
 
 
त्या चर्चेनुसार 29 सप्टेंबरला यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्याची दाखल घेऊन त्यावर वणी नगर परिषदेला त्वरित सकारात्मक निर्देश देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार मालमत्ता निवासी करात मागील कर आकारणीपेक्षा दुप्पट तसेच वाणिज्य प्रयोजनासाठी 3 पट यापेक्षा जास्त आकारणी करता येत नाही.mla sanjeevreddy bodkurwar तसेच नवीन कर आकारणी ही जुन्या दराचे 40 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. ही तरतुद असतानाही वणी नगर परिषदद्वारा जाहीर प्रस्तावित कर आकारणी या नियमाची पायमल्ली करणारी आहे. त्यामुळे हे प्रस्तावित मूल्यांकन व कर आकारणी त्वरित स्थगित करणे गरजेचे आहे.
या नोटिसमध्ये वणी नगर परिषदेने नागरिकांना 30 दिवसांत आक्षेप दाखल करण्यास सुचविले आहे. परंतु हा आक्षेप दाखल करतेवेळी नगर परिषदद्वारा 31 जुलै 2026 च्या प्रस्तावित कर आकारणीपैकी 50 टक्के रक्कम भरावयास सांगण्यात येत आहे, जे पूर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. वणी नगर परिषदच्या या कृत्यामुळे सामान्य नागरिकांत शासनविरोधी भावना निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0