शासकीय आयटीआयमध्ये रोजगारक्षम उद्या अभ्यासक्रमाची सुरवात

07 Oct 2025 19:57:10
वर्धा, 
pm-modi : पांडुरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील अल्पमुदतीच्या विविध नावीण्यपूर्ण आणि स्वयंरोजगारास पूरक अशा अभ्यासक्रमांचा उद्या ८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ होणार आहे.
 
 

pm modi 
 
 
 
या कार्यक्रमाला स्थानिक स्तरावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, पुंडलिक दरवळकर, आय.एम.सी.चे अध्यक्ष सी. दिलीपकुमार यांची उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य संजय कोकुलवार व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एम.बी. गायकवाड यांनी केल आहे.
 
 
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असुन युवक युवतींनी तथा इतर जे रोजगार आणि स्वयंरोजगार करू इच्छितात अशा सर्वांनी आपले प्रवेश ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करुन अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संजय कोकुलवार यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया संस्थेमध्ये पार पाडल्या जात आहे.
Powered By Sangraha 9.0