हिंगणघाट,
hinganghat-rss-vijayadashami-festival : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगराचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव रविवार १२ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉटन मार्केट जी. बी. एम. मोहता विद्यालयाच्या बाजूला काळी सडक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख वते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख शैलेश पोतदार राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून येथील ख्यातनाम चित्रकार व शिल्पकार हरिहर पेंदे उपस्थित राहणार आहेत.
४.४० वाजता पथसंचलन कॉटन मार्केट येथून निघणार आहे. विजयादशमी उत्सवाला हिंगणघाट नगरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंगणघाट नगर संघचालक विनोद नांदुरकर, नगर कार्यवाह श्यामसुंदर मेघरे यांनी केले आहे.