हावरापेठ मंदिरात काकड आरतीस प्रारंभ

07 Oct 2025 16:19:46
नागपूर,
Hawarapeth temple गणपती हनुमान मंदिर हावरापेठ येथे मागील 38 वर्षांपासून कार्तिक महिन्यात पारंपारिक पद्धतीने काकड आरतीचे सादरीकरण करण्यात येत असते. यावेळी सुध्दा कोजागिरी पौर्णिमेला मंदिरावर ध्वजारोहण करुन आज पासून काकड आरतीला सुरवात करण्यात आले. पहाटे ४:३० ला मंदिर परिसरातील स्वच्छता व रांगोळीने सुशोभित करून, मंदिरातील सर्व मूर्तींचे मंगलस्नान व पूजन-प्रशांत कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
Hawarapeth
 
टाळ मृदंगाच्या नादांत देवांच्या व संतांच्या भुपाळीचे सादरीकरण करण्यात येत असते. मंदिराला प्रदक्षिणा घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना व थोर महापुरुषांचा आणि संताचा जयघोष घेऊन प्रसाद वितरण करण्यात आले. शरद पौर्णिमे पासून सुरू झालेली काकड आरती एक महिना भर नित्यक्रमाने त्रिपुरी पौर्णिमे प्रयत्न चालेल. Hawarapeth temple काकडआरतीचे सादरीकरण- तुळसीराम गायकवाड, रमेश मेहर, रामेश्वर बांगडे, मोरेश्वर बांगडे, ॲड. रमेश गवळी, प्रशांत कामठे, बाळकृष्ण हातागळे, राजू इटनकर तुळसाबाई गायकवाड काकड आरतीचे सादरीकरण करीत असतात.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0