लाडक्या बहिणींचे २० हजार २६६ अर्जबाद

07 Oct 2025 14:50:24
वर्धा,
ladaki bahin applications विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील गरजू महिलांना दिला जात आहे. संबंधित योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असले, तरी आतापर्यंत संबंधित योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असले तरी, आतापर्यंत संबंधित योजनेसाठी प्राप्त अर्जांपैकी तब्बल २० हजार २६६ अर्ज रिजेट करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडया बहिणींची धाकधूक वाढली आहे.
 

लाडकी बहीण  
 
 
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला संबंधित योजनेचा मोठा लाभ मिळाल्याचे बोलले जात असतानाच या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचेही उघड होत आहे. त्यामुळे अशा लाभार्थी विरोधात गृह चौकशीला सुरुवात करण्याचे धोरण सरकारच्या वतीने आत्मसात केले जात आहे. लाडकी बहीण योजनेचा एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ घेता येत नाही. पण काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. तर ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे. तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घेत, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणे, अशा महिलांनीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ३ लाख २० हजार ४१९ महिलांनी अर्ज केला. त्यापैकी २० हजार २६६ महिलांचे अर्ज रिजेट करण्यात आले आहे.ladaki bahin applications त्यात योजनेच्या लाभातून माघार घेणार्‍या १३४ महिलांचाही समावेश आहे. घरात चारचाकी वाहन असणे, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणे, इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणे, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लोकांचे अर्ज आदी कारणांमुळे संबंधित अर्ज रिजेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय रिजेट अर्जाची स्थिती
वर्धा : ४७९७
हिंगणघाट : ३१७८
देवळी : २७७०
आर्वी : २४९९
सेलू : २२२७
कारंजा : २८४९
समुद्रपूर : १८४१
आष्टी : ११०५
Powered By Sangraha 9.0