नागपूर,
Chenab Railway Bridge : जम्मू-काश्मिर प्रदेशातील अतिशय दुर्गम भागातून वाहणाऱ्या चंद्रभागा(चिनाब)नदीवर बांधण्यात आलेला चिनाब रेल्वे पुल म्हणजे भारतीय अभियांत्रिकी काैशल्याचा आविष्कारी नमूना आहे, असे प्रतिपादन चिनाब पुलाच्या जिओ टेक्निकल कन्सलटंट डाॅ. जी माधवी लथा यांनी केले.
सप्तर्षी पुरस्कार वितरण साेहळ्यासाठी नागपुरात आलेल्या डाॅ. माधवी लथा यांनी रविवारी धरमपेठेतील प्राे. राजेंद्रसिंग सायन्स एक्सप्लाेरेटरीमधील उद्याेन्मुख शास्त्रज्ञांशी संवाद साधला. याप्रसंगी व्हीएनआयटीचे संचालक डाॅ. प्रेमलाल पटेल, डाॅ. राजेंद्रसिंग सायन्स एक्सप्लाेरेटरीचे अध्यक्ष हेमंत चाफले, धरमपेठ शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश देव, प्राे. राजेंद्रसिंग सायन्स एक्सप्लाेरेटरीतच्या संचालिका सीमा उबाळे उपस्थित हाेते.
डाॅ. माधवी लथा यांनी स्वतःचा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवास व त्याची विस्तृत माहिती दिली. चिनाब पुलाच्या निर्मितीला 17 वर्षाहून अधिक कालावधी लागल्याचे सांगत त्या म्हणाल्या, दाेन डाेंगर आणि त्यातून वाहणारी महानदी या भाैगाेलिक परिस्थितीत नदीच्या पर्यावरणाला काेणतीही हानी न पाेहाेचवता पूल उभारणे महाकठीण हाेते. ताशी 220 किलाेमीटर प्रतितास या वेगाने वाहणारे वारे, 0-40 इतके कमी तापमान, सतत हाेणारे भूस्खलन, पाकिस्तानची सीमा अशा अनेक अडचणींवर मात करत, दळणवळण आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा अडचणींवर मात करत हा पूल बांधला गेला. हा पहिला भूकंप वा बाॅम्बने क्षती न हाेणारा जगातला पहिलाच पूल असून त्यात आपले याेगदान हाेते याचा अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डाॅ. सीमा उबाळे यांनी केले.