कारंजात पकडला १ लाखांचा गांजा

07 Oct 2025 19:44:51
कारंजा लाड, 
marijuana-seized-karanja : स्थानिक शहर पोलिस अ‍ॅशन मोडवर आली असून, ६ ऑटोबर रोजी मध्यरात्री तब्बल १ लाख रूपयांच्या १०.५ किलो गांज्यासह एका जाण्यास अटक करण्यात आली आहे.
 
 
 
washim
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, येथील शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑटोबर रोजी मध्यरात्री स्थानिक एस. टी.बस स्थानक परिसरात दोन पंचासमक्ष धाडसत्र राबविले आणि एका आरोपीला १० किलो ५९५ ग्रॅम (किंमत १ लाख रुपये) गांजासदृष्य अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या बाळगले म्हणून अटक केली. याप्रकरणी सरकार तर्फे सपोनी योगेश धोत्रे (३९, वर्ष स्थानीक गुन्हे शाखा वाशीम) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निलेश सुभाष गायकवाड (३५, रा. पंचशिल नगर ओझर ता. निफाड जि. नाशिक) याच्या विरुद्ध एनडीपीएस अधिनीयम १९८५ चे कलम ८ (क)२० ब दोन (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार करीत आहे.
Powered By Sangraha 9.0