नमो नेत्र संजीवनी अभियान पूर्ण

07 Oct 2025 13:31:12
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
namo netra sanjeevani येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयद्वारे नमो नेत्र संजीवनी अभियान यशस्वी पार पडले. या अभियान हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या निर्देशांप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस पंधरवाडा कालावधीत राबविण्यात आले.  संपूर्ण राज्यभरात 1 लाखापेक्षा अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि 10 लाखांपेक्षा अधिक चष्मे वितरणाचे लक्ष्य ठेवून हे अभियान घेण्यात आले होते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान नमो नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हे अभियान अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांच्या नेतृत्वात झाले. नेत्ररोग विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. स्नेहल बोंडे चौरसिया, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अक्षय पडगिलवार आणि डॉ. सुप्रिया सुटे यांनी विशेष भूमिका बजावली.
 

namo netra 
 
 
तसेच, नेत्ररोग विभागातील डॉ. अखिलेश राठोड, डॉ. कस्तुर पुनसे, डॉ. स्मितल जैस्वाल, डॉ. वैभव सावळे, डॉ. निखिल चांदुरे, डॉ. नेहल बोथरा, डॉ. श्वेता गजभिये, डॉ. प्रथमेश, डॉ. शंतनू आणि डॉ. संतोष यांनी विविध स्थळी जाऊन रुग्णांची तपासणी केली.
या दरम्यान नेत्र विभागाच्या ओपीडीमध्ये 1345 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधून 391 रुग्णांना चष्म्याचा नंबर देण्यात आला. या कालावधीत 154 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 25 किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तसेच गावोगावी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आर्णी, चौसाळा, साने गुरुजी नगर, पिंपळगाव, मोहा, नांझा, भोसा, वाघापूर, मेंदळा, वाघडी, जोडमोहा आणि डोंगरखर्डा या गावांत शिबिरे घेण्यात आली. या ठिकाणी 1450 रुग्णांची तपासणी झाली. यातील 635 रुग्णांना चष्म्यांचे नंबर देण्यात आले असून, 299 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.namo netra sanjeevani याशिवाय, दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना चष्म्यांचे वितरण थेट त्यांच्या घरी केले जाणार आहे, ही या अभियानाची विशेष बाब आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांना आधुनिक नेत्रतपासणी व उपचार विनामूल्य उपलब्ध झाले असून, गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
हे अभियान राबविण्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले असून अधिष्ठाता आणि नेत्र रोग विभाग यांनी डॉ. सुखदेव राठोड आणि डॉ. सुभाष ढोले यांचे आभार मानले आहेत.
Powered By Sangraha 9.0