ना. गडकरींमुळे राजकारणात ओळख मिळाली : ना. भोयर

07 Oct 2025 20:17:23
वर्धा, 
Pankaj Bhoyar : तीन वेळा आमदार आणि आता मंत्री होण्याची संधी मिळाली. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आपल्यासाठी संकटमोचक राहिले आहे. स्नेहालयाचा परिसर नवीन उर्जा देणारा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
 
k
 
 
 
स्थानिक प्रभाग ५ येथील स्नेहलनगरातील स्नेहधाम येथील सुरक्षा भिंत व सौंदर्यीकरणासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा स्नेहालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कांचन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहधामच्या अध्यक्ष डॉ. दीप्ती काशीकर, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना लांडगे, भाजपा शहर अध्यक्ष निलेश किटे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, नपचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, वर्धा विधानसभा प्रमुख प्रशांत बुर्ले, वर्धा विधानसभा अध्यक्ष निलेश पोहेकर, बंटी गोसावी, अर्चना आगे, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. शितल भोयर, जगदीश टावरी आदी उपस्थित होते.
 
ना. भोयर पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये पक्षाची तिकीट मिळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. या कठीण प्रसंगी नितीन गडकरी मदतीला धावून आले. दत्ता मेघे यांचे देखील यात मोठे योगदान होते. आपल्याला आमदार बनविण्यात त्यांचे व आपले सर्वांचे मोठे योगदान आहे. स्नेहधामचा परिसर सुंदर असा परिसर आहे. स्नेहधाममध्ये जेव्हा आलो तेव्हा येथून नवी उर्जा घेऊन गेलो आहे. स्नेहधामच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
 
याप्रसंगी कांचन गडकरी यांनी देखील स्नेहधामच्या कार्याची स्तुती केली. जनतेच्या हिताचे कार्य केले की, जनता त्या नेत्याला कधीच विसरत नाही, असे त्या म्हणाल्या. ना. गडकरी यांनी नेहमीच विकासाचे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख देश व विदेशात झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0