मारेगावच्या वीज प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्या

07 Oct 2025 13:21:44
तभा वृत्तसेवा
मारेगाव,
power project मारेगाव येथे मंजूर 132 केव्ही वीज केंद्राकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणारे निवेदन मारेगाव तालुका भाजपच्या वतीने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
 

pwer project 
 
 
मारेगाव तालुक्यातील 132 केव्ही वीज प्रकल्प शासन स्तरावर मंजूर असूनही, अद्याप त्या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी, तालुक्यातील गावांना तसेच विविध उद्योगधंद्यांना वारंवार वीज पुरवठ्याच्या खंडतेचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून उद्यागधंदे अर्थिक अडचणीत सापडत आहेत.power project मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मारेगाव येथील मंजूर वीज प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी मंत्री डॉ. अशोक उईके यांना दिलेल्या निवेदनातून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, ज्ञानेश्वर चिकटे, प्रसाद ढवस यांनी केली.
Powered By Sangraha 9.0