तब्बल ४ लाख महिलांवर लैंगिक अत्याचार!

07 Oct 2025 09:23:13
वॉशिंग्टन,
Sexual assault on 4 lakh women संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा जबरदस्त पर्दाफाश केला आहे. जम्मू आणि काश्मीरबाबत दिशाभूल करणारी विधाने करत भारतावर आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी चोख प्रत्युत्तर दिले.त्यांनी पुढे सांगितले की, १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइट सुरू करणारा पाकिस्तान हा तोच देश आहे, ज्याच्या सैन्याने तेव्हा ४,००,००० महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते.
 

Sexual assault
 
हरीश यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला आरशात दाखवत म्हटले की, “जो देश स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करतो, पद्धतशीरपणे नरसंहार करतो आणि जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटी विधाने करतो, तोच आज भारतावर आरोप करतो. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतावर आरोप करत म्हटले होते की, काश्मिरी महिला दशकांपासून लैंगिक हिंसाचाराला तोंड देत आहेत. त्यावर हरीश यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, दरवर्षी आम्हाला भारताविरुद्ध, विशेषतः जम्मू आणि काश्मीर या भारताच्या अविभाज्य भागाबाबत, दिशाभूल करणारी विधाने ऐकावी लागतात. पण जग आता पाकिस्तानच्या बनावट कथा ओळखते.
 
 
भारताने स्पष्ट केले की, पाकिस्तान दहशतवादाचे मूळ केंद्र आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे खरे चेहरे आता लपवता येत नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये हा प्रसंग म्हणजे पाकिस्तानसाठी आणखी एक आंतरराष्ट्रीय अपमानाचा क्षण ठरला आहे. भारताने पुन्हा एकदा ठामपणे दाखवून दिले की, सत्य आणि जबाबदारीपासून पळून जाणाऱ्या पाकिस्तानला आता जगासमोर उत्तर द्यावेच लागेल.
Powered By Sangraha 9.0