तभा वृत्तसेवा
मारेगाव,
shrutika bangade मारेगाव, येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थिनी श्रुतिका निलेश बांगडे ही विभागीय स्तरावरील पावसाळी क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये 19 वर्षे वयोगटामध्ये वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरासाठी पात्र ठरलेली आहे.
गुणवंतराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कवडीपूर, पुसद, येथे विभागीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 19 वर्षीय वयोगटात श्रुतिका बांगडे या विद्यार्थिनीने 86 किलो वजन उचलून अव्वल स्थान प्राप्त केले, तिच्या यशाबद्दल विभागीय स्तरावरील कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य अशोक पोले यांच्या हस्ते तिला पदक देऊन सन्मानित करण्यात आले.shrutika bangade या विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक मेहफूज अली यांचे संस्थाध्यक्ष संध्या राजेश पोटे, सचिव राजेश पोटे, मुख्याध्यापक ज्योत्स्ना बोंडे यांनी अभिनंदन केले. मार्डीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.