पुलगाव येथे निघाली श्याम निशाण यात्रा

07 Oct 2025 15:14:40
पुलगाव,
shyam nishan yatra स्थानिक पदम गुलाबनगर येथे खाटू श्याम बाबांच्या भतांनी सुंदर मंदिर उभारण्याचा संकल्प केला असून या संकल्पनेला आकार देण्यासाठी भतांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले आहे. भतांच्या या एकत्रित प्रयत्नांना यश लाभू लागले असून लवकरच खाटू श्याम बाबांचे मंदिर उभारले जाईल. दरम्यान, ६ रोजी भूमिपूजनापूर्वी श्याम निशाण यात्रा काढण्यात आली.
 

खाटू श्याम  
 
 
या यात्रेची सुरूवात शहरातील शीतला माता गणेश मंदिरापासून झाली. तेथून ही यात्रा चुडी मोहल्ल्यातून मार्गक्रमण करत मदन मोहन भवनाजवळ आली. महावीर भवनासमोरून स्टेशन चौक, तिलक चौक आणि कॅम्प रोड, बस स्थानक चौकावरून आठवडी बाजारात पोहोचल्यावर माजी नगराध्यक्ष गिरीश चौधरी यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर यात्रा भगतसिंग चौकात पोहोचली. या ठिकाणी साहू कुटुंबीयांनी स्वागत केले.shyam nishan yatra गांधी चौक, महावीर चौक मार्गे यात्रा पदम गुलाबनगरात पोहोचली. येथे यजमान उमेश शर्मा, पवन जोशी, जुगल टावरी, अमित चौधरी, सत्यनारायण वर्मा, ब्रजेश शर्मा आणि आशिष गांधी यांनी सपत्नीक भूमिपूजन केले. या निमित्ताने आज सायंकाळी ६ वाजतापासून श्याम सेवा समितीच्या वतीने श्याम संकीर्तन संध्या आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदिर सुमारे २५०० चौरस फूट क्षेत्रफळावर दोन मजली उभारले जाणार असून परिसर सुमारे ८ हजार चौरस फूट क्षेत्राचा राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0