प्रभूनगरात आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

07 Oct 2025 20:32:48
नागपूर,
health camp प्रभूनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि संवर्धिनी महिला सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मनीष नगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी तायवाडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची तज्ज्ञ चमू उपस्थित होती. डॉ. प्रणाम सदावर्ते, डॉ. अभय पाठक, डॉ. सुरभी सदावर्ते, डॉ. नहुष बावनकर तसेच टेक्निशियन यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. भा.ज.पा. नरेंद्र नगर मंडळाचे महामंत्री खोरगडे आणि मीडिया प्रमुख चव्हाण यांनी शिबिराला भेट देऊन कार्याचे कौतुक केले.
 
health camp
 
मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर कडूकर आणि कार्याध्यक्षा प्राची जयंत देशपांडे संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहिले. अंजली देशपांडे, स्वाती फडणवीस, तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळ प्रमुख जयंत देशपांडे आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वी पार पडले. health camp परिसरातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात कविता अडकणे आणि कविता शर्मा यांनीही मोलाचे सहकार्य केले.
सौजन्य: स्वाती फडणवीस, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0