नदीत वीज प्रवाह म्हैस ठार, मालक बचावला

07 Oct 2025 19:59:55
तळेगाव (शा.पंत), 
Wardha News : परिसरातील नदीत वीज प्रवाह शिरल्याने म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवार ७ रोजी दुपारी घडली. या घटनेत जनावरं मालक लुकेश आगरकर थोडयात बचावले.
 
 
 
jlk
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक शेतकरी लुकेश आगरकर २० ते २५ म्हशी व काही बकर्‍या नदीकाठावर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला. एक म्हैस पाण्यात उतरताच ती तडफडत काही क्षणातच कोसळली. म्हशीला काय झालं म्हणून लुकेश आगरकर हे पाहायला गेले असता त्यांना सुद्धा विजेचा जोरदार धक्का लागला. मात्र, पायात चप्पल असल्यामुळे ते दूर फेकल्या गेले. जनावरं मालकाने इतर म्हशी व बकर्‍यांना नदीकाठावरून दूर हाकलून लावले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
 
 
वीज प्रवाहाचा उगम शोधण्यासाठी वीज विभागाला तसेच पोलिसांना कळविण्यात आले. तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात नदीकाठावरून जाणार्‍या वीजवाहिनीतून तार तुटून पाण्यात पडल्यामुळे पाण्यात वीज प्रवाह शिरल्याचे पुढे आले.वीज विभागाच्या अधिकार्‍यांनी वीजपुरवठा बंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेत म्हशी मालकाचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0