तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी : सशक्त परिवार’ या राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, जिल्ह्यात स्त्री व बाल आरोग्यावर केंद्रित विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. 17 सप्टेंबरला इंदूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या मोहिमेचा जिल्ह्यातील महिला, बालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण व शहरी रुग्णालये तसेच प्राथमिक व उपकेंद्रांमध्ये विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
आरोग्य शिबिरांमधील प्रमुख आरोग्य तपासण्या व लाभार्थींची संख्या क्षयरोग तपासणी महिला 17,570 व पुरुष 7,098, सिकलसेल आजाराची तपासणी महिला 7,583 व पुरुष 5,546, सिकलसेल आजाराचे कार्ड वाटप महिला 5,934 व पुरुष 4,163 याप्रमाणे झाले.
आदिवासी भागातील महिलांसाठी प्रसुतीपूर्व काळजी तपासणीमध्ये हिमोग्लोबिन पातळीची चाचणी, गर्भधारणेदरम्यान पोषण आणि काळजी यावर 2,704 गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यात आले.
रक्तक्षय तपासणी महिला 54,687 व पुरुष 209, बालकांना लसीकरण सेवा बालक 1,993 व बालिका 2,106, पीएमजेएवाय अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वयवंदना कार्डचे वितरण 1,29,610 झाले असून रक्तदान शिबिरांत एकूण 413 दात्यांनी रक्तदान केले.
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब तपासणी महिला 1,37,370 व पुरुष 20,055, राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मधुमेह तपासणी महिला 1,13,753 व पुरुष 12,884 याप्रमाणे झाली.
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमात कॅन्सर तपासणी (मुख, स्तन व गर्भाशय) तपासणी महिला 78,442 व पुरुष 27,718, आरोग्य विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती व समुपदेशन महिला 2,34,798 व पुरुष 38,507, नमो नेत्र संजीवनी अंतर्गत 2,679 नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1554 रुग्णांची चष्म्यांच्या नंबरकरिता नोंदणी करण्यात आली.
या मोहिमेमध्ये एकूण 456 मोतीबिंदू रुग्णांचे निदान झाले असून 372 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच नेत्रदानाकरिता 178 व अवयवदानाचे 150 संमतीपत्र भरुन घेण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 721 मुले व 822 मुलींची तपासणी करण्यात आली असून, 2 रुग्णांची हृदयरोग व एका रुग्णाची अपेंडिक्स शस्त्रक्रियाही करण्यात आली.
पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य दंत व शल्य चिकित्सा शिबिर 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान एकूण 2,002 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, शरीरावरील गाठी, स्तनातील गाठी, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया अशा एकूण 85 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मोहिमेत आजारानुसार आवश्यकतेप्रमाणे औषधी वितरित करण्यात आल्या. या मोहिमेसाठी आरोग्य विभागातील सर्व विशेषज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले.