अतिक्रमण विरोधात नागरिकांचे बेमुदत उपोषण गुरुवारपासून

08 Oct 2025 21:24:22
ढाणकी, 
Atikramaṇ virud'dha Uposhan रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे ढाणकी येथील प्रभाग ९ मधील त्रस्त नागरिक गुरुवार, ९ ऑक्टोबरपासून उपोषणास बसणार आहेत. निवेदन, तक्रारी देऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत असून यावर त्वरित कारवाई करावी, अशी या मागणी आहे. प्रभाग ९ मधील तोटेवाड कॉलनीत जाणार्‍या मार्गावर शेत सर्वे १८१/१ अ मध्ये नकाशानुसार २० फुटांचे रस्ते दिलेले आहेत. खरेदीनुसारही २० फुटांचे रस्ते आहेत. परंतु शब्बीरखा फत्रुखा पठाण व शेख अकबर ऑटोवाले यांनी २० फुटांच्या रस्त्यात अतिक्रमण करून बांधकाम व टिनाचे शेड उभे केले. यामुळे तोटेवाड कॉलनीतील नागरिकांना त्रास होतो आहे.
 
 
Uposhan
 
Atikramaṇ virud'dha Uposhan २० फुटांचा रस्ता प्रशासनाने मोकळा करून देण्याकरिता, न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने, तोटेवाड कॉलनी ढाणकी-उमरखेड मार्गावर येथील स्थानिक नागरिक दादाराव काळे, गणेश धवसे, रवी हरकरे, संतोष मेसरे व नितीन काळे बेमुदत उपोषणास बसणार आहेत. या नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु ढाणकी नगर पंचायतने त्यावर काहीही कारवाई नसून नाईलाजाने लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण अस्त्राचा वापर नागरिकांना करावा लागतो आहे. अतिक्रमणामुळे त्रस्त प्रभाग ९ मधील नागरिकांना ढाणकी नगर पंचायतकडून न्याय मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0