सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा वकील संघातर्फे निषेध

08 Oct 2025 18:22:27
मंगरुळनाथ,
attack on Chief Justice Bhushan Gavai सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या मंगरुळनाथ वकील संघातर्फे निषेध करण्यात आला. विधीज्ञ मंडळाचे वतीने ठराव घेऊन कामकाज बंद ठेवण्यात आले.
 

attack on Chief Justice Bhushan Gavai 
सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीशांवर झालेला हा हल्ला केवळ व्यक्तीगत नसून भारतीय न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. कदाचित हा प्रकार लोकशाही नष्ट करण्याच्या षड्यंत्राचा भाग तर नाही ना ? असा प्रश्न उदभवत आहे. शासनाने या घटनेचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अशा घटना पून्हा व्हायला नको यासाठी प्रशासनाने दखल घेणे सुद्धा गरजेचे आहे.घटनेमुळेन्यायालयीन परंपरा,संविधानाचा सन्मान आणि देशाच्या लोकशाही मूल्यांवर आघात झाला आहे.न्यायव्यवस्था बिघडण्याची शयता नाकारता येत नाही. या घटनेच्या निषेधार्थ मंगरुळनाथ वकील संघातर्फे कामकाज बंदचे आंदोलन छेडण्यात आले. वकील संघाचे वतीने या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहावे, असा ठराव घेतला. यावेळी अ‍ॅड. आर.एस.पांडे, अ‍ॅड. एम. ए.बोलके, अ‍ॅड. जी. बी. राठी, अ‍ॅड. बी. एम. ठाकरे, अ‍ॅड. प्रमोद बनसोड, अ‍ॅड. ए. एन. मुळे, अ‍ॅड. एस. आर. जाखोटिया, अ‍ॅड. पी.आर. बंग, अ‍ॅड. रवींद्र टोपले, अ‍ॅड. वैभव बेलोकार, अ‍ॅड. आर. एस. खडसे, अ‍ॅड. बलराज शृंगारे, अ‍ॅड. मनोज बरघट, अ‍ॅड. अजय गवारगुरु, अ‍ॅड. अलीम शेख, अ‍ॅड. अजय भगत, अ‍ॅड. किशोर चव्हाण, अ‍ॅड. फैजान राजा आदी विधीज्ञ उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0