मुंबई,
Bigg Boss 19 वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’चा नवा आठवडा अधिकच रंगतदार ठरतो आहे. सलमान खानच्या ‘वीकेंड का वार’मध्ये स्पर्धकांची चांगलीच झाडाझडती झाली असतानाच, वाइल्डकार्ड स्पर्धक मालती चाहरच्या एन्ट्रीनं घरात नवं वळण मिळालं आहे. मात्र, घरातले वाद, मतभेद आणि वैयक्तिक आयुष्याचे खुलासे अजूनही ताजेच आहेत.
अलीकडेच प्रसारित झालेल्या भागात स्पर्धक तान्या मित्तलने प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिकच्या वागणुकीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की अमालची सवय, त्याचा स्वभाव तिला तिच्या माजी प्रियकराची आठवण करून देतो.एपिसोडमध्ये जीशान कादरी आणि तान्या यांच्यात अमालच्या वागणुकीवर चर्चा सुरू होती. जीशान म्हणाला की, “अमाल सध्या ज्या टप्प्यावर आहे, तिथे मी १०-१५ वर्षांपूर्वी होतो. त्याचा तो लगेच प्रतिक्रिया देण्याचा (इम्पल्सिव) स्वभाव मला खूप ओळखीचा वाटतो.”या संवादावर तान्याचं उत्तर सर्वांनाच चकित करणारं ठरलं. तिनं हलक्या आवाजात जीशानला सांगितलं, “माझा एक्स याच्यासारखाच होता. अगदी सेम होता. त्यामुळे जी गोष्ट आता दिसते आहे, ती तेव्हाही अनुभवली होती.”या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की अमाल मलिकचा उतावळा आणि रागीट स्वभाव तान्याला तिच्या जुन्या नात्याची वेदना पुन्हा आठववत आहे.
यावेळी जीशाननेही अमालबद्दल आशावाद व्यक्त केला. तो म्हणाला, “अमाल अजून शिकतो आहे. दोन-तीन वर्षांनी तो विचार करूनच प्रतिक्रिया द्यायला शिकेल. मीसुद्धा पूर्वी असाच होतो. लगेच बोलायचो, पण आता आधी ऐकतो, मग विचार करतो आणि शेवटी प्रतिक्रिया देतो. मीही याच स्वभावामुळे बऱ्याच चुका केल्या आहेत.”जेव्हा मालती चाहरने जीशानला विचारलं की, ‘‘तुला असं का वाटतं?’’ तेव्हा त्याने हे सविस्तर सांगितलं.
घरात बदलते समीकरणं आणि नव्या चर्चा
या खुलाशानंतर घरातील वातावरण आणखीच रंगतदार बनलं आहे. एकीकडे अमाल मलिक स्वतःच्या स्वभावामुळे चर्चेत आला आहे, तर दुसरीकडे तान्याच्या भावनिक प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या लक्षात आल्या आहेत.‘बिग बॉस १९’मध्ये दर आठवड्याला नव्या नाट्यमय घडामोडी उलगडत आहेत. आता तान्या-अमालमधील ही भावनिक तुलना शोच्या पुढील प्रवासाला कोणते वळण देईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.